नारंगी - सारंगी धरण शंभर टक्के भरले २ हजार क्युसेक पाणी सोडले

Foto
शुभम लुटे
वैजापूर : सलग दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने वैजापुरात आहाकार माजवला होता. शहरातील नारंगी सारंगी धरण शंभर टक्के भरल्याने २००० क्युसेक इतक्या वेगाने पाणी सोडण्यात आले. 
धरण परिसरातील भिलवस्ती दत्तनगर हा परिसर संपूर्ण पाण्याखाली गेला. ४०० हून अधिक नागरिकांना इतर ठिकाणी हलवण्यात आले. या नागरिकांना शिवाजी मंगल कार्यालय धुमाळ मंगल कार्यालय येथे तात्पुरता आश्रयाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनातर्फे त्यांना पुरी भाजी वाटप करण्यात आली.

गोदावरी नदीमध्ये नांदूर मधमेश्वर धरणातून ७० ते ८० हजार क्युसेक वेगाने पाणी सोडल्याने नदी काठावरील गावात पुराचे पाणी घुसले. एनडीआरएफच्या पथकाने नागरिकांना पाण्यातून
सुरक्षित ठिकाणी हलवले. पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार रमेश बोरनारे यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन पूर परिस्थितीचा आढावा घेतला. पंचनामे होतील असे आश्वासन दिले. पूर आल्याने धरणाचे पाणी ओलांडल्याने खंडाळा, बोरसरचा संपर्क तुटला अनेक घरांत शिरले. त्यामुळे तीस ते चाळीस दुकानांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने सर्व माल भिजला. बोर नदीने धोक्याची पातळी आहे.